.jpg)
यामध्ये बिलांच्या कारणासाठी तसेच मनमानीपणे अनियमित भारनियमन करुन शेतकरी व ग्रामस्थांना वीजेच्या समस्येचा सामाना करावा लागत असल्याने तसेच शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, ऊसाच्या दरामध्ये असलेली तफावत आदी प्रश्न होते.
यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, शहरप्रमुख दिपक आंधळकर, उपशहरप्रमुख सुशांत गायकवाड, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, शंकर गायकवाड, नामदेव भोसले, शिवसेनेचे बापू कानगुडे, विजय कानगुडे, संजय वाणी, शशिकांत जाधव, भारत कदम, बाळासाहेब आंधळकर, आण्णासाहेब पवार, दादा नलावडे, किरण बारंगुळे, दिपक मारकड, किरण वाघमोडे, दत्ता शिंदे, बाबा रोडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या ख्येने उपस्थित होते.
सौंदरे (ता. बार्शी) येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. बार्शीतील पोस्ट ऑफिस चौक, महाद्वार चौक, जुनी-नवी चाटी गल्ली मार्गे शहरातील मध्यवर्ती महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. बसस्थानकाशेजारी मुख्य कार्यालयात निवेदन देण्यात आले, तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना शेतकर्यांच्या विविध प्रश्नांच्या मागण्यांचे लेखी निवेदन दिल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनोगते व्यक्त केली.