उस्मानाबाद :- सन 2013-2014 साठी वाळू लिलाव ई-निविदा (ई-टेंडरींग) आणि ई-लिलाव (ई-आक्शन) पद्धतीने होणार असून दि. 17 आक्टोबर रोजी त्यासंदर्भातील प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सकाळी 11-30 वाजता प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लिलावधारकांनी संबंधित दिवशी वेळेवर हजर राहून यासंदर्भातील प्रकिया समजावून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.