उस्मानाबाद -: जिल्ह्यासाठी माहे ऑक्टोबर-2013 करिता शासनाकडून अद्यापही केरोसीनचा कोटा अद्यापही प्राप्त न झाल्यामुळे सप्टेंबरच्या केरोसीन कोटयाच्या अधीन राहून ऑक्टोबर,2013 साठी 50 टक्के केरोसीनचे  आदेश नुकतेच जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी जारी केले आहेत.
      किरकोळ केरोसीन परवाना धारकांचे परवाना नूतनीकरण झाल्याची खातरजमा झाल्यानंतरच  त्यांना केरोसीनचे वितरण करावे. तसेच त्यांना जोडण्यात आलेल्या कार्डधारकांच्या संख्येनुसार आणि त्यांना जिल्हा पुरवठा विभागाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसारच नियतन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. केरोसीन विक्रेत्यांच्या उचल, वाटपावर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
    उस्मानाबाद-29 टक्के, तुळजापूर-29, उमरगा-29, लोहारा-30, भूम-29, परंडा-29,कळंब-30 आणि वाशी -30 टक्के राहील.         
     तहसिलदारांनी त्यांच्या स्तरावरुन दरमहा तालुक्यातील संबंधित गॅसएजन्सीकडून एक गॅस धारक व दोन गॅसधारक यांची यादी हस्तगत करुन गॅसधारकांच्या शिधापत्रिकेवर स्टॅंपिंग करुन शासन नियमानुसार कमी नियतन देण्यात यावे. जर गॅसधारकांच्या शिधापत्रिकेवर स्टॅंपिंग न करता  किरकोळ केरोसीन परवानाधारकास कमी-जास्त नियतन देण्यात आल्यास त्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर निश्चित केली जाईल.
     सर्व तहसीलदार यांनी अर्धघाऊक/ किरकोळ विक्रेता यांना वाटपासाठी किरकोळ/हॉकर्स/स्वस्त धान्य दुकाने संलग्न केलेली आहेत ते कार्डधारकांना केरोसीनचे वाटप सुरळीपणे करतात किंवा कसे याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
 
Top