उस्मानाबाद :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गंत माकणी (ता. लोहारा) येथे समाधान रविवार, दि. ६ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भारत विद्यालय येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विविध विभागांचे तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी याठिकाणी उपस्थित राहणार असून माकणी महसूल मंडळातील गावांतील नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन उमरग्याचे उपविभागीय अधिकारी व्ही. एल. कोळी आणि लोहा-याचे तहसीलदार शशीकांत गायकवाड यांनी केले आहे.
नागरिकांना त्यांच्या कामांसाठी वारंवार तालुका व जिल्हा स्तरावर हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांचे काम गाव व महसूल पातळीवर व्हावे आणि प्रशासनाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी, याहेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या अडचणी ग्रामस्तरावर सोडवाव्यात, असा यामागील उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत विविध विभागांशी थेट निगडीत योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यात महसूल विभाग- तहसील कार्यालयाशी संबंधित खरीप 2012 अनुदान वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना व धनादेशाचे वाटप, जात, नॉन क्रिमीलेअर, रहिवासी,7/12 वर वारस नोंद करणे, उत्पन्न,अज्ञान पालनकर्ता नोंद कमी करणे, आदी प्रमाणपत्र, पोलीस पाटील ओळखपत्र वाटप, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, सातबारावर वारस नोंद करणे, अज्ञान पालनकर्ता नोंद कमी करणे, निवडणूक ओळखपत्र वाटप, हक्क अभिलेख वाटप, महसूल विषयक इतर सर्व कामे, विशेष साहाय्य योजना अर्ज स्वीकृती, प्रलंबित फेरफार नोंदीवर कार्यवाही, आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज,
पंचायत समितीशी निगडीत- इंदिरा आवास योजना व रमाई घरकुल योजना धनादेश वाटप, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींची नोंद 7/12 वर घेणे, विशेष घटक येाजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे वाटप, बीपीएल लाभार्थ्याना निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह धनादेश वाटप, वृध्द कलाकारांना मानधनाचे वाटप करणे, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रमाणपत्रे वितरीत केले जाणार आहे.
शिक्षण विभागाशी संबंधित अपंग विद्यार्थ्यांसाठी असणा-या योजनांची माहिती देणे, आम आदमी योजनेअंतमर्गत पात्र विद्यार्थ्याचे फॉर्म भरुन घेणे,अस्वच्छ कामगार शिष्यवृत्ती प्रस्ताव पडताळणी करुन दाखल करुन घेणे,अपंग संसाधन कक्षामार्फत अल्पदृष्टी विद्यार्थ्याची नेत्र तपासणी करणे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधियिम 2009 बाबत मार्गदर्शन करणे, सर्वशिक्षा अभियानाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन करणे, अपंग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा फॉर्म भरुन घेणे, शालेय पोषण आहार व पुरक पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करणे. विस्तारअधिकारी उद्योग पं.स. महिला बचत महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री करणे. समावेशित शिक्षण योजनेसाठी लाभार्थी यादी ठरविणे
कृषी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना एचटीपी पंप वाटप व खते वाटप, जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रमांतर्गत माती नमुने तपाणी करणे, ठिंबक सिंचन प्रस्ताव स्वीकारणे व लाभार्थी निवडणे, आत्माअंतर्गत शेतकरी गट नोंदणी व प्रमाणपत्राचे वाटप, रब्बी हंगामासाठी शेतकरी गटामार्फत बियाणे खताची मागणी करणे, शेतकरी जनता अपघात विमा योजना, शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत बीया व रोपे वाटप
पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु आरोग्य तपासणी व लसीकरण वासरांना जंतनाशक औषध, अझोला लागवड प्रात्यक्षिक. आरोग्य विभागाच्यावतीने नेत्र तपासणी, महिलांची शुगर, रक्त तपासणे, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना माहिती फॉर्म भरुन घेणे, हिमोग्लोबीन तपासणी, किशोरवयीन मुलींची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी, आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच 8 वी ते 10 च्या गरजू विद्यार्थ्यांना सौर दिवे, बेटी बचाव स्टॉल, रक्त दान शिबीर आयोजित करणे, मोबाईल मेडिकल व्हॅनमार्फत विविध तपासण्या व सेवा वीजमंडळाच्या वतीने शेतक-यांना नवीन वीज जोडणी. राज्य विद्युत वितरण- वीजबिलाची दुरुस्ती, घरगुती नवीन वीज जोडणी, राजीव गांधी ग्रामीण विघुतीकरण योजनेतंर्गत बीपीएल लाभार्थ्यांस 15 रु. मध्ये त्वरीत वीज जोडणी देण्यात येणार आहे. मोजणी विभाग-ई मोजणी अर्ज स्वीकृती फी भरुन घेणे, नागरीकांची सनद वाटप करणे,मोजणी नकाशा प्रत देणे, संपादित जमिनीचे कमी जास्त पत्रकाची माहिती देणे व 7/12 ला नेांद घेणे. ग्राम पंचायतीमार्फत जन्म, मृत्यु नोंदणी प्रमाण पत्राचे वाटप,मग्रारोहयोअंतर्गत मजूर नोंदणी व जॉब कार्ड वाटप करणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र व जात, रहिवाशी प्रमाणपत्राचे वाटप करणे. सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत पिक कर्ज वाटप,संस्था नेांदणी ,डॉ पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेची माहिती देणे, सहकार विभागाकडील सहकारी संस्थांना अर्थ सहाय्याची माहिती देणे. पोलीस विभाग-महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्ग गावे तंटामुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे ,चॅप्टर केसेस प्रतिबंधात्मक करणे, आपआपसात तडजोडीने निकालात काढणे,
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बस सवलत पासेस वितरण केले जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक- बँकेत नवीन खाते उघडणे, कर्ज प्रकरणाची माहिती देणे, फॉर्म स्वीकारणे. सार्वजनिक बांधकाम- माहिती व मार्गदर्शन,भूकंपरोधकाबत मार्गदर्शन करणे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे- जवाहर दशलक्ष विहीरीचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र वितरण करणे,दुय्यम निबंधक- संगणकाव्दारेदस्तनोंदणी प्रक्रियेची माहिती देणे, सन2208 मध्ये नांदणी झालेले मुळ दस्तांचे पक्षकारांना वाटप करणे,बाजारमुल्य दर तक्त्याबाबत मार्गदर्शन करणे. महिला व बाल विकास विभागामार्फत- विविध योजनेची माहिती भरुन घेणे, पाककृती बनविणे प्रात्यक्षीक, विधवा महिलेंच्या मुलींच्या लग्नासाठी 10 हजार रुपये वाटप योजनेचे अर्ज भरुन घेणे, पिठाच्या चक्की वाटप करणे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनेची माहिती देवून मार्गदर्शन करणे, आधारकार्डची नोंदणी कार्यक्रम, आधारकार्डची प्रत उपलब्ध करुन देणे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत रोपे वाटप, रोपवाटीका तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, वृक्षलागवड करणे, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरणामार्फत मोफत रोपे वाटप करणे, आपत्ती व्यवस्थापन-प्राक्षिक माहितील व मार्गदर्शन करणे, सहाययक संचालक,रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय,माहिती व मार्गदर्शन करणे आणि प्रत्यक्ष नाव नोंदणी करणे. महा ई सेवा केंद्र- शासनाच्या विविध विभागाच्या सेवा सुविधा छत्राखाली समाधान योजना या उपक्रमांतर्गत माहिती उपलब्ध करुन देणे.