उस्मानाबाद - राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी  सकाळी 6-50 वा. सोलापूरहून अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण.  स.7-45 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. स. 8-30 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स. 9-30 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.9-45 वा. उस्मानाबादहून कोंड, ता. जि.उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-30 वा. सनराईज दुध संकलन केंद्र व काँग्रस आय शाखेच्या उदघाटन समारंभास उपस्थिती (स्थळ कोंड) दु. 1 वा. कोंड येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 2 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण करतील.
      रविवार,दि.6 रोजी स.10 वा. अणदूर येथून माकणी, ता. लोहाराकडे प्रयाण. स.11 वा. माकणी येथे आगमन व समाधान योजनेच्या कार्यक्रमास उपस्थिती. दु.2-30 वा. माकणीहून अणदूरकडे प्रयाण. दु.3-30 वा.अणदूर येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.  
 
Top