उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध आजाराने ग्रासलेल्या 35 बालकांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) हा उपक्रम हाती घेण्यात आला. महागडे औषधी उपचार शक्य नसणा-या कुटुंबातील मुलांच्या शस्त्रक्रिया या कार्यक्रमांतर्गत करण्यात आल्या. यात हर्निया, फायमोसिस, अन्डिसेंडेड टेस्टीस, सिस्ट, टान्सिलाईटीस अशा आजारांचा यात समावेश आहे.
नुकतीच जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डा. अशोक धाकतोडे, डा. सुरेश करंजकर यांच्या पथकाने या मुलांवर शस्त्रक्रिया केल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी स्वता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी दि. 1 एप्रिल 2013 पासून 33 जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत 20 पथके स्थापण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये 2 वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता व एक परिचारीका असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
बाल मृत्यू कमी करणे, मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा, कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे, वय वर्षे 6 ते 18 या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विशेष पथकाकडून करुन घेणे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करणे, किरकोळ दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांवर औषधोपचार करणे, गंभीर दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना संदर्भ सेवा देवून बरे करणे, ह्रदयरोग, किडनीचे आजार यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तपासणी अभिलेख जतन करुन ठेवणे, पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करणे ही या बालस्वास्थ्य कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
आंगणवाडी व केंद्र, गाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (खासगी व शासकीय), शासकीय अनुदानित वस्तीशाळा, पर्यायी शिक्षण केंद्रे,, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, समाजकल्याण विभागामार्फथ चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा, अपंग विद्यार्थी शाळा हा या मधीत लक्षीत गट आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 2013-2014 या वर्षात हर्नियाच्या 29, फायमोसीसच्या 34, अनडिसेंन्डेड टेस्टीसच्या 6, सिस्टच्या 9, टॅनसिलाईटसच्या 1 अशा 79 शस्त्रक्रिया आतापर्यंत मोफत करण्यात आल्या आहेत.