मुंबई : शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात खेळामध्ये सहभागी व्हावे तसेच त्यांच्यातील क्रीडा गुणांना राष्ट्रीय स्तरावर वाव मिळावा या उद्देशाने भारतीय शालेय खेळ महासंघाच्या 14 नवीन शालेय खेळ प्रकारांना शासनाने मान्यता दिली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवावे या उद्देशाने जास्तीत जास्त खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश होणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेता शासनाने राष्ट्रीय स्तरावरील 12 नवीन शालेय खेळ प्रकार आणि राज्यस्तरावरील 2 नवीन शालेय खेळ प्रकारांना मान्यता देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त शालेय खेळाडू राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जातील. सद्यस्थितीत भारतीय शालेय खेळ महासंघातर्फे आयोजित स्पर्धामध्ये राज्यातील 44 शालेय क्रिडा प्रकार खेळले जातात. या 14 नवीन शालेय खेळ प्रकाराच्या समावेशामुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यता देण्यात आलेल्या 12 नवीन राष्ट्रीय शालेय क्रीडा प्रकारामध्ये टेनिस बॉल, टेनिक्वाईट, सेपाक टाकरा, रस्सीखेच, जंपरोप, टेनिस हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट, बुशू कयाकिंग व कॅनोईंग, सॉफ्ट टेनिस, स्क्वॅश आणि कराट तसेच राज्यस्तरावर वुडबॉली व शुटींगबॉल या 2 नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सदर क्रीडा प्रकारामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी त्यांना काही सवलती देण्याचा ठराव सुद्धा यावेळी संमत झाला. शालेय खेळाडूंचे शैक्षणिक सत्रामध्ये नुकसान होऊ नये यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 25 वाढीव गुण देण्यात येतील तसेच राज्यसंघात निवड झाल्यानंतर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनामार्फत इतर खेळ प्रकारांप्रमाणे खर्च करण्यात येईल.
तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या समितीने सात पंजीबद्ध क्रीडा संस्थांच्या खेळांना मान्यता देण्याचा ठरावसुद्धा या बैठकीच्या वेळी संमत झाला. मान्यताप्राप्त झालेल्या संस्थामध्ये बृहन महाराष्ट्र नागपूर, महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन नांदेड, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन पुणे, महाराष्ट्र रोलबॉली असोसिएशन, पुणे आणि महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन, नागपूर यांचा समावेश आहे.
वरील मान्यता प्राप्त संस्थांनी किंवा संघटनांनी तसेच यापूर्वी मान्यता प्राप्त झालेल्या संस्था किंवा संघटनांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचे संपूर्ण निकाल क्रीडा व युवक संचालनालयास सादर करणे बंधनकारक राहील.
तसेच विभागीय/ जिल्हा क्रीडा संकूल अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा संकूल शिंपोली येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याकरीता दिड कोटीची तरतूद करण्यात आल्याचे यावेळी वळवी यांनी सांगितले.
यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे.एस.सहारीया, क्रीडा आयुक्त पंकज कुमार, सह संचालक नरेंद्र सोपली, वित्त विभाग तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.