बार्शी : येथील भगवंत सहकारी संस्थेतील कर्मचारी बिपीन नाईकवाडी यांनी विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केली होती. सदरच्या प्रकारास त्याच संस्थेतील रत्नाकर आंधळे हे जबाबदार असून चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी तक्रार मयत नाईकवाडी यांनी पत्नी श्रीमती ज्योत्स्ना नाईकवाडी यांनी बार्शी पोलिसात केली. सदरच्या घटनेचे तपास कार्य सुरु करुन बार्शी पोलिसांनी रत्नाकर आंधळे यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता यालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सदरचा प्रकार दि. २६ जुलै २०१३ रोजी पहाटे ५ च्या पूर्वी लक्ष्मी तीर्थ बार्शी येथे घडला आहे, विषारी औषध प्राषण करुन घरी आलेल्या बिपीन यांना त्यांच्या पत्नीने काय होते अशी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी पोलिसांनी ३०६ नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पो.उ.नि. शोभा पडवळ या करीत आहेत.