उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने सर्वसाधारण योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी मोफत रेडिमेंट गारमेंट अँन्ड फॅशन डिझाईनींग  प्रशिक्षण कार्यक्रम  दि. 15 ऑक्टोंबर ते  13 नोंव्‍हेंबर या कालावधीत  दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
    या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक व अधिका-यांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून इच्छुक युवती व महिलांनी अर्ज प्रवेशासाठी 14 सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम असून प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक ए. बी. माळी (भ्रमणध्वनी क्रमांक 9822671421) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा एम.सी.ई.डी.कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.                           
 
Top