संगणक व्यवस्थित चालावा, यासाठी त्याची नियमित काळजी घ्यावी लागते. तसेच तो थोडा 'आजारी' वाटला तर त्यावर प्रथमोपचार करावे लागतात. यासाठी आवश्यक असतात ट्रबलशूटींग सॉफ्टवेअर्स.
* क्लॅम विन
क्लॅम विन अँटी व्हायरसचे पोर्टेबल व्हर्जन तुमच्या पीसीतील व्हायरस स्कॅन करण्यासाठी वापरता येते. हे डिव्हाईस अतिशय उपयुक्त आहे, कारण काही वेळा मालवेअरमुळे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेले अँटी व्हायरस डिस उबल करु शकते. क्लॅम विनच्या मदतीने तुमच्या फ्लॅश ड्राईव्हवर तुम्ही इन्फेक्शन्स शोधून ती काढून टाकू शकता. स्वायवेअर आणि अँडवेअरही काढून टाकण्यात याचा चांगला उपयोग होतो.
* सीक्लिनर

* रिकुवा
तुमच्या पीसीवरुन कायमस्वरुपी डीलीट झालेल्या फाईल्स परत मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. डीप स्कॅनमुळे डीलीट केलेल्या फाईल्सची यादी आपल्याला मिळते. त्यातून तुम्हाला आवश्यक असलेल्या फाईल परत घेता येऊ शकतात; पण या डिव्हाईसमुळे डीलीट केलेल्या फाईल्स परत मिळतीलच याची खात्री देता येत नाही. एखादी महत्त्वाची फाईल पर मिळवायची असल्यास हे काम तज्ज्ञ व्यावसायिकाकडून करुन घेतलेले चांगले.
अशा काही सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर तंदुरुस्त ठेवता येऊ शकतो. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता असते. या उपयांमुळे हा फटका बसण्याची वेळ येत नाही.
अशा काही सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर तंदुरुस्त ठेवता येऊ शकतो. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता असते. या उपयांमुळे हा फटका बसण्याची वेळ येत नाही.