फेसबुक व व्‍हॉटस् अँपची भुरळ तरुणाईस पडली आहे. यंदा दिवाळी सणाच्‍या निमित्‍ताने या दोन्‍ही सोशल मीडियांचा समावेश असणारा स्‍मार्टफोन खरेदी करण्‍यासाठी तरुणाईचा अधिक कल दिसून येत आहे. स्‍मार्टफोनला मागणी असल्‍याने अनेक वितरकांनी विविध स्किम सुरु केल्‍या आहेत.
    सॅमसंग मोबाईल महाग असला तरी खरेदीसाठी प्रथम प्राधान्‍य यास देण्‍यात येत आहे. त्‍यानंतर खिशाला परवडेल, अशी सुविधा देणा-या दोन कंपनीच्‍या मोबाईल खरेदीस तरुणाचा कल दिसून येत आहे. इंटरनेटच्‍या दुनियेत मोबाईलवर सफर करण्‍यासाठी दहावीपासून ते उच्‍च शिक्षण घेणा-या युवकास स्‍मार्टफोनने भुरळ घातल्‍याचे दिसते. ग्रामीण भागातही स्‍मार्टफोनचे फॅड पोहोचले असून महागडे कपडे घेण्‍यापेक्षा स्‍मार्टफोन घेण्‍याचा आग्रह मुले पालकांकडे करीत असल्‍याचे दिसून येते.
    स्‍मार्टफोन कॅमे-याच्‍या माध्‍यमातून जीवनातील प्रत्‍येक जल्‍लोष मित्रांमध्‍ये शेअर करण्‍याची उत्‍सुकता बहुतांश तरुणात दिसून येत आहे. फेसबुक व व्‍हॉटस् अँपच्‍या माध्‍यमातून नवे मित्र व मैत्रिणी जोडून त्‍यांच्‍याशी प्रत्‍येक शब्‍द व इमेद शेअर करण्‍यासाठी तरुणांच्‍या पाठोपाठ     मुलांचाही अधिक कल दिसून येतो.
    दिवाळी सणाच्‍यानिमित्‍ताने प्रत्‍येक गल्‍लीत, सोसायटीत व कॉलनीत जमणा-या तरुणाईच्‍या मैफिलीत सर्वाधिक वेळ चर्चा स्‍मार्टफोनवरच होत असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्‍मार्टफोन खरेदी केलेल्‍या मित्राचे फोन पाहून आपणही असाच फोन खरेदी करायचा असा चंगच प्रत्‍येक युवक बाळगत असल्‍याचे दिसून येते.
 
Top