बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शीच्या वतीने देण्यात येणारा शाहिर अमर शेख साहित्य पुरस्कार डॉ. मंदा कदम (कोल्हापूर), राजा माने (सोलापूर), डॉ. मुहम्‍मद आजम (अहमदनगर) यांना देण्यात येणार असल्याची घोषणा म.सा.प.बार्शी शाखेचे अध्यक्ष पां.न.निपाणीकर यांनी केली.
        संत तुकाराम यांच्या जीवन, अभंग साहित्य यांचे जीवनातील विविध पैलू तुकयावली या डॉ.मंदा कदम यांच्या कादंबरी लेखनातून मांडण्यात आले आहे. राजा माने यांच्या महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या चरित्रग्रंथात निस्सिम राष्ट्रभक्ती, प्रखर बुध्दीमत्ता, समन्वयता, राष्ट्रसेवाभा आणि दूरदृष्टभ लाभलेल्या वसंतदादा पाटील यांच्या जीवनचरित्रावर केलेल्या चरित्रग्रंथात अनेक पैलू मांडण्यात आले आहेत. डॉ.मुहम्‍मद आजम यांच्या समृध्‍दी तत्वज्ञान : स्वरुप आणि चिंत या ग्रंथात अनेक तत्वज्ञानांचा मिलाफ आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या प्रस्तावातून पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी डॉ.सूर्यकांत घुगरे, डॉ.गिरीश काशीद यांनी परिक्षणाचे काम केले आहे. यावेळी प्रमुख कार्यवाह शब्बीर मुलाणी, कार्याध्यक्ष मुकूंदराज कुलकर्णी, डॉ.दिपा सावळे, डॉ.बीरा पारसे, कोषाध्यक्ष मुकूंद कुलकर्णी, सुङ्कन चंद्रशेखर, शादरा पानगावर, प्रा.सविता देशमुख, प्रकाश गव्हाणे आदी उपस्थित होते.
 
Top