बार्शी : बार्शी तालुक्यातील बोगस अथवा अनधिकृत वैद्यकिय व्यवसायिक तसेच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनसेवा युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे.
सदरच्या मागणीचे लेखी निवेदन तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी डॉ.भोसले, मुनवर शेख, कॉंग्रेसचे नगरसेवक महेदिमियॉं लांडगे, माधव आतकरे, जाकिर शेख, वसिम शेख आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात तालुक्यातील बरीचशी जनता अशिक्षीत, गरीब असल्याने त्यांचा गैरफायदा घेऊन सदरचे बेकायदा व्यवसाय सुरु आहेत. सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलून धंदा करणार्या व्यक्तींपासून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मा.उच्च न्यायालाच्या आदेशानुसार आपल्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.