बार्शी -: मौजे गौडगाव (ता. बार्शी) येथील 12 व्यक्तींना मागील 3 वर्षापासून धान्य मिळत नसून काही जणांची शिधापत्रिका जीर्ण झाल्याने नव्याने मिळावी, अशी मागणी तहसिलदार यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते राहुल भड व ग्रामस्थांनी केली आहे. सदरच्या मागणीसोबत ग्रामसभेचा ठराव केल्याची प्रत जोडण्यात आली आहे.