नळदुर्ग :-  राजपुत समाज संघटनेच्‍या अध्‍यक्षपदी सुधीर हजारे यांची सर्वानुमते निवड करण्‍यात आली. विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रणजितसिंह ठाकूर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक होऊन पुढील कार्यकारिणीची निवड करण्‍यात आली. अध्‍यक्षपदी सुधीर हजारे तर उपाध्‍यक्ष अजय चंदेले, खुशालसिंह ठाकूर, कोषाध्‍यक्ष सरदारसिंग ठाकूर, सचिव मंगेश चंदेले, सहसिचव किरण ठाकूर आदींची निवड करण्‍यात आली आहे. या बैठकीस राजपुत समाज संघटनेचे माजी उपाध्‍यक्ष सुनिल हजारे जयसिंग बिसेनी, मनिषसिंह हजारे, राहुल हजारे, इंद्रजित ठाकूर, जगदीश गहेरवार, सुजित हजारे यांच्‍यासह समाज बांधव उपस्थित होते.
 
Top