नळदुर्ग -: नवरात्रौत्सवानिमित्त श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जिर्णोध्दार समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण उद्योगपती अशोकराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नगरसेवक शहबाजी काझी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नितीन कासार आदीजण उपस्थित होते.
नळदुर्ग येथील श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जिर्णोध्दार समितीच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा व शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम कु. पुजा कुलकर्णी, द्वितीय कु. वैष्णवी येवते, तृतीय सौ. गीता अमृत पुदाले तर सामान्य ज्ञान परीक्षेत प्रथम सारंग कुलकर्णी, द्वितीय दिपक सावंत या विजेत्या स्पर्धकांना मंदीर समितीच्यावतीने प्रशस्ती पत्र व अन्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दरम्यान यावेळी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी भेट देऊन श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. नवरात्र महोत्सवात आयोजित स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाबाई मंदीर जिर्णोध्दार समितीच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेतला.