![]() |
कमल पाटील |
औरंगाबाद : परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती कमलताई दशरथ पाटील (मुळ गांव धुळे) यांचे येथे शनिवारी (दिनांक १२ ऑक्टोबर १३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. राष्ट्रसेवा दल, नर्मदा बचाव आंदोलनातील कार्यकर्त्यांशी त्यांचे सामाजिक संबंध होते.
धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या समाजसेविका म्हणून ३० वर्षे कार्यरत होत्या. १९५१ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला. धुळे-नंदुरबार भागात कुटुंब नियोजनाच्या अभियानात त्या अग्रभागी होत्या. त्यांचे पती समाजवादी नेते दिवंगत दशरथ तात्या पाटील यांच्यासह त्यांना सामाजिक कृतज्ञता निधीचा गौरव पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात कन्या सुषमा, जावई ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, पुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रा. शाम पाटील व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता औरंगाबाद येथील पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती होती.