नळदुर्ग -: दुष्काळामुळे होरपळलेल्या तुळजापूर तालुक्यातील फळबागा जिवंत ठेवण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नळदुर्ग येथे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शेतक-यांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. दरम्यान शनिवार रोजी 72 लाख रूपये 586 शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असुन सदरील अनुदान ना. चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाले आहे.
नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण , माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरूजी, माजी नगराध्यक्ष दत्तात्र्य दासकर, नगरसेवक नितिन कासार, शहबाज काझी, तालुका कृषी आधिकारी डी. आर. जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत फळबाग वाचण्यासाठी हेक्टरी तीस हजार रूपये अनुदान शासनाने जाहिर केलेले होते. त्यामध्ये पंधरा हजार रूपये प्रतिहेक्टरी प्रथम हप्ता व द्वितिय हप्ता पंधरा हजार रूपये असे वाटप निश्चित केले होते. तालुक्यातील 2807 शेतक-यांना आनुदान वाटप करण्यात येणार असुन नळदुर्ग येथे तेरा शेतक-यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये 1992 हेक्टर क्षेत्र फळबागेसाठी सुमारे 2 कोटी 99 लाख रूपये प्रथम हप्त्यापोटी वाटप करण्यात आलेले होते . त्याचबरोबर दुसरा हप्ता म्हणुन तेवढीच रक्कम वाटप करण्यात येणार होती मात्र अनुदान टप्याटप्पाने उपलब्ध झाले असल्याने अद्यापपर्यंत 2 कोटी 20 लाख वाटप झालेले आहे . उर्वरीत रक्कम उपलब्ध झाल्याने 72 लाखाचे शनिवार रोजी 586 शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यावेळी शब्बीर अहमद पटेल , फुलाबाई लष्करे , सिद्राम साळुंके, कमलबाई मोरे, मल्लिनाथ बिराजदार, हणमंत बिराजदार, श्रीनिवास मोरे, असुदउल्ला इनामदार, बाबुमियॉ पटेल, भिमाशंकर कबाडे, रमेश पुदाले, या शेतक-यासह कृषी सहाय्यक डि. पी. बिराजदार, आर . एम. पवार, डि. आर . कुरघुले, एस. बी देशमुख , सी. व्ही. खोबण, ए. एस जोजन, आर. के . दुधभाते , आदिजण उपस्थित होते.