मकबुल नदाफ
नळदुर्ग :- येथील हॉटेल साईप्‍लाझाचे मालक मकबुल नदाफ यांचे इंडिका कार अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना शुक्रवार दि. 25 ऑक्‍टोबर रोजी सकाळी सात वाजता बेलकुंड-औसा रस्‍त्‍यावर घडली. ते लातूरकडे कामानिमित्‍त जाताना ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
    हॉटेल व्‍यावसायिक मकबुल कोंडाजी नदाफ (वय 50 वर्षे, रा. नळदुर्ग) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍याचे नाव असून जब्‍बीउल्‍लाह सनाउल्‍लाह मौजन (वय 25, रा. नळदुर्ग) असे गंभीर जखमी झालेल्‍या चालकाचे नाव आहे. नदाफ हे त्‍यांची इंडिका कारने (क्रमांक एमएच 13 / 5319) कामानिमित्‍त शुक्रवार रोजी सकाळी लातूरकडे जात असताना बेलकुंड-औसा रस्‍त्‍यावर इंडिका कार झाडावर आदळून हा अपघात झाला. नदाफ यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, दोन मुले, तीन मुली, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे नळदुर्ग शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.
 
Top