पंढरपूर –: आपल्या हरवलेल्या पिलांचा विरह सहन न झाल्याने एका माकडीने अखेर एका कुत्र्याच्या पिलास कवटाळले असुन त्याला कवेत घेऊनच घरांवर,भिंतीवर,झाडांवर भटकंती सुरु ठेवली. मात्र कुत्र्याचे ते पिल्लू खाली पडले आणि जीव गमावून बसले. त्यानंतरही चूक न उमगवलेल्या त्या मुक्या जीवाने कुकुत्र्याचे दुसरे पिल्लू उचलले आणि गावातील भटकंती सुरुच ठेवली आहे. मातृत्वाच्या मायेची ही अनोखी घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. मानवाचे पुर्वज म्हणून माकडांकडे पाहिले जाते. मानवाच्या ब-याच भाव – भावनांचे प्रतिबिंब माकडांमध्ये दिसुन येते ,आपल्या आपत्याविषयीची असणारे जीवापाड प्रेम हा मानवी स्वाभावगुण माकडांच्या ठिकाणीही दिसून येतो.
माकडांच्या याच आपत्य प्रेमामुळे एका कुत्र्याच्या लहान पिलाचा नाहक बळी गेल्याचे दिसुन आले आहे. आता कुत्र्याच्या दुस-या पिलाचाही जीव टांगणीला लागला असुन त्याला कसे वाचवावे या विवंचनेत गादेगावकर मात्र अडकून पडलेले आहेत. गादेगाव येथे सुमारे 15 दिवसांपुर्वी एक माकडीन आपल्या दोन पिलांना पोटाशी कवटळुन घेऊन आली होती. त्यांना घेऊनच गावात इकडे – तिकडे भटकत असताना एके दिवशी अचानक तिचे दोन्ही पिले गायब झाली. कुणी तरी ती रात्री चोरुन नेली असावीत असा ग्रामस्थांचा संशय आहे. आपली दोन्ही पिले नसल्यामुळे आस्वस्थ झालेल्या माकडीने त्यांचा विरह सहन न झाल्याने असेल की गैरसमजाने असेल तीन दिवसांपूर्वी कुत्र्याचे लहान पिल्लू उचलुन घेतले आणि त्याला आपल्या पोटच्या पिल्लाप्रमाणे सांभाळु लागली . त्याला पोटाशी कवटाळून घेतच घरावरुन उडया मारत, झाडावर चढत तीची गावातुन भटकंती सुरु होती. पिल्लास आपले दुधही पाजायची व ते पिल्लुही बहुदा तीचा लळा लागला असावा किंवा त्याचा नाइलाजही असल्याने माकडणीस पिउन राहत होते. ते पिल्लु माकडणी सोबत दोन दिवस राहिले. मंगळवारी रात्रीच्या वेळी तीच्या हातुन पिल्लु सुटून खाली पडले व गंभीर जखमी होवुन मरण पावले. त्यानंतर माकडणीने कुत्र्याचे दुसरे पिल्लु उचलुन घेतले असुन त्याला सोबत घेवुनच या झांडावरुन, त्या झाडावर व घरा-घरावार उडया मारत आहे. आता त्या पिल्लाचाही जीव टांगणीला आहे.