बार्शी : बेलगांव (ता. बार्शी) येथे क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने व्यायाम शाळेचे काम हाती घेतले असून त्याचे भूमीपूजन उद्योगपती अमोल डिसले यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी अँड. राहुल झालटे, बार्शीचे सुपुत्र व जळगाव येथील मुख्‍याधिकारी विजय नलावडे, अँड. संतोष गायकवाड, प्रा. सागर डुरे, डॉ. वाळके, गणेश उमाप, अतुल डुरे, उमेश चव्‍हाण, राऊत, सुरेश उमाप, हैदरअली शेख, महेश खारे, संस्‍थेचे अध्‍यक्ष धिरज शेळके, सरपंच पांडुरंग महिंगडे, माजी सरपंच हरिदास शेळके, ज्‍येष्‍ठ नेते भाऊसाहेब शेळके, संतोष गरदडे, धनवंत शेळके, दत्‍ता सोलवट आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना अँड. राहुल झालटे म्‍हणाले, ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक व्‍यायाम शाळेची जोड मिळाल्‍यास देशाची क्रीडा प्रकारातील घौडदौड वाढेल, सक्षम, मजबुत व परिपूर्ण युवापिढी निर्माण करुन व्‍यसनमुक्‍त पिढी होण्‍यासाठी व्‍यायामाचे महत्‍त्‍व ओळखण गरजेचे आहे.   
 
Top