परंडा -: उधारी देण्याचे निमित्त करून एका युवकाने किराणा दुकानदार महिलेचा विनयभंग केल्याची घटना भोत्रा (ता. परंडा) सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
परंडा तालुक्यातील भोत्रा येथील किराणा दुकानात एका विवाहित महिलेचा गावातील अविनाश मधुकर गोफणे याने उधारी देण्याचा व अंडी खरेदी करण्याचे निमित्त करून विनयभंग केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंग व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिला वालावलकर करीत आहेत. तसेच परंडा शहरात उपजिल्हा रुग्णालयाशेजारी राहणार्या महिलेचा शेजारी राहणार्या खंडू साडेकर याने दारू पिऊन विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.