![]() |
प्रतिकात्मक |
पांगरी (गणेश गोडसे) : ममदापुर (ता. बार्शी) येथे पिके, कडबा जाळण्याची मालिका सुरूच असुन ममदापुर येथील पिंपळगांव शिवारात शेती असलेल्या एका शेतक-यांच्या सोयाबिनचा ढिगारा कोणीतरी अज्ञाताने पेटवुन देऊन शेतक-याचे पन्नास हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.
शशिकांत विनायक हाके (वय 40) असे सोयाबिनचा ढिगारा जळुन नुकसान झालेल्या शेतक-याचे नांव आहे. शशिकांत हाके यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांची ममदापुर येथील पिंपळगांव शिवारात शेती असुन त्यांनी पेरलेल्या सोयाबिनच्या दोन पिशव्यांचे काड गोळा करून त्याचा ढिग लावुन त्यांच्याच शेतात ठेवला होता. रात्रीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने त्यांच्या शेतातील सोयाबिनचा ढिगारा पेटवुन देऊन त्यांचे पन्नास हजाराच्या पुढे नुकसान केले आहे. हाके यांच्या फिर्यादिवरुन पांगरी पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द सोयाबिन जाळुन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास पांगरी पोलिस करत आहेत.