
ऐतिहासिक नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर वसलेले असून नळदुर्गला दैनंदिन कामकाजासाठी दररोज पन्नास ते साठ गावातील नागरिकांचा संपर्क आहे. त्याचबरोबर महामार्गावरुन मोठ्याप्रमाणावर राज्यासह परप्रांतातील रहदारी आहे. त्याचबरोबर येथील लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. शहरात राष्ट्रीयकृत बँकेची स्टेट बँक हैद्राबाद ही एकच शाचा असल्यामुळे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या बँकेत होत असते. त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी पैसे काढायचे किंवा भरायचे असतील तर नागरिकांना पूर्ण दिवस याठिकाणी ताटकळत बसावे लागते. त्यामुळे महिला व वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा नळदुर्गच्या अधिका-यांनी याठिकाणी एटीएम मशिन्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी स्थानिक मनसेच्यावतीने ५ ते ७ वेळा लेखी निवेदन देऊन देखील संबंधित अधिका-यांनी याची दखल घेतली नाही. म्हणून उपकार्यालय स्टेट बँक ऑफ हैद्राबाद लातूर येथील अधिका-यांनी याबाबतीत लक्ष घालून एटीएम मशिन्सची सुविधा प्राप्त करून द्यावी अन्यथा बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनसेचे माजी शहराध्यक्ष दिलीप शंकरशेट्टी, गणेश मोरडे, माजी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष शंतनू डुकरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.