बंगळूर : जुन्‍या काळातील सुप्रसिध्‍द ज्‍येष्‍ठ गायक मन्ना डे यांचे आज गुरुवार रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
    मन्ना डे काही दिवसांपासून आजारी होते. त्‍यांच्‍या छातीत जंतूसंसर्ग झाल्‍याने बंगळूरमधील एका खासगी रुग्‍णालयात शनिवारी दाखल करण्‍यात आले होते. काही दिवसांपासून त्‍यांच्‍या उपचार चालू सुरु होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. मन्ना डे यांना कालच आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. मागील एका महिन्यापासून ते डायलिसीसवर होते.
    आपल्या आवाजाच्या अनोख्या अंदाजानं मन्ना डे यांनी तब्बल 40वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. जुन्या काळ्यातल्या अनेक मातब्बर नायकांना त्यांना आपला आवाज दिला होता. मन्ना डे यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे. रवींद्र संगीताची जन्मभूमी असलेल्या कोलकात्यात एक मे १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. सुमधूर रवींद्र संगीताचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव आहे. ९४ वर्षे वयाच्या मन्ना डे यांनी हिंदीसह बंगाली, भोजपूरी, मगध, पंजाबी, मराठी, मैथिली, आसामी, उडिया, गुजराती, कोकणी, कन्नड, मल्याळी, अवधी, छत्तीसगढी अशा विविध भाषांमध्ये संगीत आणि पार्श्वधगायन केले. मन्ना डे यांनी 1943मध्ये आलेल्या 'तमन्ना' चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी तब्बल साडेतीन हजारांहून हिंदी, मराठी बंगाली आणि इतर भाषांमध्ये गाणी गायलीय.
    'ए मेरी जोहराजबी', 'पुछो ना कैसे', 'प्यार हुआ इकरार हुआ' तसंच 'एक चतूर नार' ही त्यांची गाणी प्रचंड गाजली.
     देवदास, आवारा, सीमा, बरसात की रात, झनक झनक पायल बाजे, दो बिघा जमीन, देख कबिरा रोया, श्री ४२०, चोरी चोरी, मदर इंडिया, मधुमती अशा पन्नास आणि साठच्या दशकातील गाजलेल्या चित्रपटांना मन्ना डे यांचा स्वर लाभला.
 
Top