![]() |
| शोभा कवडे |
वाशी : सोयाबीन मळणी यंत्रामध्ये सापडून एका शेतमजूर महिलेचा जागीच करूण अंत झाल्याची घटना बुधवार रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाशी येथे घडली. या दुर्घटनेत सोयाबीनच्या मशीनमध्ये सदरील महिलेचे डोके, हात अक्षरशः धडावेगळे झाल्याने ही घटना अतिशय भयंकर अशी घडली. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोभा नवनाथ कवडे (वय 35 वर्षे, रा. वाशी, जि. उस्मानाबाद) असे सोयाबीन यंत्रात अडकून मृत्युमूखी पडलेल्या दुर्देवी महिलेचे नाव आहे. यातील शोभा ही बुधवार रोजी तिच्या स्वत:च्या शेतातील सोयाबीन मळण्यासाठी गेली होती. मळणी यंत्र चालू केल्यानंतर शोभा कवडे व सुनिता कवडे ह्या दोघी मळणी यंत्रात सोयाबीनचे काड टाकत होत्या. मळणी यंत्रात काड टाकत असताना शोभा कवडे या महिलेचा पदर मळणी यंत्रात अडकला. पदर गेल्यानंतर सदरील महिला मळणी यंत्राकडे ओढली गेली व त्या महिलेचे डोके त्या मळणी यंत्रात गेले. शोभा कवडे ही महिला मळणी यंत्रात जाताच त्या महिलेचे डोके धडा वेगळे झाले. हात तुटून पडले व ही महिला कांही क्षणात गतप्राण झाली. डोक्याचे अक्षरश: तुकडे झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. ही घटना इतकी भयंकर होती की पाहणा-यांना ही घटना पहावली नाही असे कांही घटना पहायला गेलेल्या कांही जणांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर डोके, हात व धड वेगवेगळ्या पोत्यात भरून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वाशी शहरात ही घटना समजताच ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे असे म्हणत प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते.
मृत झालेली शोभा ही महिला एका गरीब कुटूंबातील असून ती शेतमजुर म्हणून इतरांच्या शेतात कामास जात होती. या महिलेला ७ वर्षाची मुलगी आहे. यामुळे सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात आहे. वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. इंगोले यांनी केले.