उस्मानाबाद : तुळजापुर तालुक्यातील आणदुर येथे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन  सुनिल चव्हाण यांचे संपर्क कार्यालय फोडणारे चोरट्यांना अटक   जेरबंद करण्यास पोलीसांना यश आले आहे.
    अणदुर (ता. तुळजापूर) येथील बसस्थानकासमोर सुनिलराव चव्हाण यांच संपर्क कार्यालय आहे. हे संपर्क कार्यालय दि. २९ सप्टेबर ते ३० सप्टेबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. तसेच कार्यालयाशेजारील पशु वैद्यकीय अधिकारी कृष्णा रेड्डी यांचे घराचे कुलुप तोडुन सोन्याचे दागीणे व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणात नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    गून्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात एमएच १३ एएक्स ८९०९ या संशयीत इंडीका गाडीचा नंबर पोलीसांना मिळाला होता. सदरील गाडीचा शोध घेत असताना पोलीसांना ही गाडी मार्डी येथुन सोलापुर हायवे कडे येत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार मार्डी पासून आठ किलोमीटर आंतरावर पोलीसांनी या गाडीचा चालक प्रविण मोहन सरडे यास पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सपंर्क कार्यालय व घरफोडी केल्याचे कबुल केले.
    त्यानंतर सरडे याच्या साथीदार शिवाजी रामा काळे यालाही पोलीसांनी सोलापुर येथुन अटक केली असून त्यांनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोन्ही आरोपींना पोलीसांनी नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.
 
Top