ताज्या घडामोडी

पॅरिस - भारत २०५० मध्ये चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
     फ्रेंच इन्स्टिटयूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेने जागतिक लोकसंख्येबाबत अभ्यास केला आहे. येत्या २०५० मध्ये भारताची लोकसंख्या वाढून एक अब्ज ६० कोटी होणार असून लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणार आहे. तर चीनमध्ये लोकसंख्या एक अब्ज ३० कोटी होऊन दुस-या क्रमांकावर येईल. २०५० मध्ये जागतिक लोकसंख्या वाढून नऊ अब्ज ७० कोटी एवढी होणार आहे.
    सध्या एक अब्ज ३० कोटी एवढी लोकसंख्या असलेला चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पाठोपाठ दुसरा क्रमांक घेत भारताची लोकसंख्या एक अब्ज २० कोटी एवढी आहे.
     आयएनईडी या संस्थेने जूनमध्ये हा अभ्यास केला असून हा अहवाल जागतिक बँक व संयुक्त राष्ट्र संघ यांना सादर केला आहे.

सध्या सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश

»चीन- एक अब्ज ३० कोटी
»भारत- एक अब्ज २० कोटी
»अमेरिका- ३१ कोटी ६० लाख
»इंडोनेशिया- २४ कोटी ८५ लाख
»ब्राझिल- १९ कोटी ५५ लाख

२०५०मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश

»भारत – १६० कोटी
»चीन – १३० कोटी
»नायजेरिया – ४० कोटी चार लाख
»अमेरिका – ४० कोटी
»इंडोनेशिया – ३६ कोटी सहा लाख
»पाकिस्तान – ३६ कोटी तीन लाख
»ब्राझिल- २२ कोटी सात लाख
»बांगलादेश – २० कोटी दोन लाख
»कोंगो – १८ कोटी दोन लाख
»इथोपिया – १७ कोटी आठ लाख
»फिलिपीन्स – १५ कोटी दोन लाख
 
Top