सोलापूर : सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांनी सप्टेंबर 2013 चे त्रेमासिक विवरणपत्र ई.आर.-1 जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे दि. 31 ऑक्टोंबर 2013 पूर्वी संगणकावर फिड करुन पाठवावे असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.
     सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी 30 सप्टेंबर 2013 चे विवरणपत्र अहवालाचा तिमाही कालावधी संपताच 30 दिवसाच्या आत 31 ऑक्टोंबर 2013 पर्यंत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचेकडे पाठविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या विभागाच्या http://www.maharojgar.gov.in   संकेतस्थळावरून तिमाही अखेरचे ई. आर. 1 विवरणपत्र ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
     सदरहू विवरणपत्र विहीत वेळेत सादर केले नाही तर उपरोक्त अधिनियमांचे उल्लंघन केल्याचे समजण्यात येईल व कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोद घ्यावी.
 
Top