कळंब (बालाजी जाधव) : कोथळा (ता. कळंब) येथील ज्ञानयोग विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगट मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. 27 सप्टेंबर रोजी बावी (ता.जि. उस्मानाबाद) येथे घेण्यात आलेल्या विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत ज्ञानयोग विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम नांदेड येथील संघाचा 32 गुणांनी पराभव केला व अंतिम सामन्यात लातूर ग्रामीण या संघाचा 22 गुणांनी पराभव करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्ञानयोग विद्यालयाचा हा संघ पात्र ठरला आहे.
14 वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाचे नेतृत्व कर्णधार शितल ओव्हाळ हिने केले. तर प्रतिक्षा शिंदे, निशा सिरसट, शितल शिंदे, गंगासागर शिंदे, वैशाली ओव्हाळ, शुभांगी मोदी, पूजा अंबीरकर, भाग्यश्री डोंगरे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. या विजयी संघाला डी.आर. विरगट, अनिल शिंदे, ज्ञानोबा शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे अभिनंदन संस्थेचे सचिव चत्रभुज टेळे, मुख्याध्यापक फुलचंद कदम व कोथळा ग्रामस्थांनी केले आहे.