सोलापूर :- राज्य निवडणूक आयोगाने पुणे विभागातील 31 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. शासन परिपत्रक अन्वये आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करु नये असे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आचारसंहिता कालावधीत दरमहा दुस-या सोमवारी होणारा विभागीय लोकशाही दिन ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जाणार नाही.