मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना कन्यादान योजनेंतर्गत रु. 10 हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत 2003-04 यावर्षी पासून विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबांच्या दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना 10 हजार रुपये अर्थसहाय्य मुलीचे आईवडिल किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे देण्यात येते. तसेच सामुहिक विवाहसोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे 2 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्था, संघटना सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करु इच्छितात त्यांनी आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर नवीन प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आर.सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, पूर्व, मुंबई यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे, आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.