बार्शी / पांगरी :  तुळजापुर येथुन देवदर्शन कार्यक्रम आटोपुन गावाकडे जाणा-या भाविकांच्या टेम्पोला एस. टी. बसने पाठीमागुन जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चोवीस भाविक गंभिर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रोजी उस्मानाबाद बार्शी मार्गावर चिखर्डे ता.बार्शी शिवारात घडली. सर्व जखमी बार्शी तालुक्यातील व उंबर्गे गावचे रहिवाशी असुन त्यांच्या बार्शीत वेगवेगळया रूग्णालयात उपचार सुरू आहेत
    पौर्णिमेच्या यात्रा काळात जादा बस सोडण्यात आल्या असून रात्रभर चोखपणे काम बजावत पहाटे तिसर्‍या फेरीची ड्युटी बजावणार्‍या बस चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत.    रस्त्याच्या कडेला वाहन लावून झोपलेल्या यात्रेकरुंच्या टेंपो वाहनाला एसटी बसने पाठीमागून धडक दिली. सदरची दुर्घटना घडल्यानंतर बसचा चालक जगदाळे हा पळून गेला असल्याची माहिती समोर येत आहे. जादा सोडलेल्या एसटी बसचा क्रमांक एम.एच.२० बी.एल. ००३९ तर टेंपोचा क्रमांक एम.एच.१३ ए.एन. १५७९ असा आहे. जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुळजापूरहून उस्‍मानाबाद ङ्कार्गे जाणार्‍या जादा बसमध्ये ४२ प्रवासी होते. सदरच्या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : प्रविण जाधव वय २० रा.उंबर्गे,ता.बार्शी, अल्लाउद्दीन मुजावर रा.उंबर्गे, दत्तात्रय हावळे रा.उंबर्गे, भगवान सुरवसे वय ३६ रा.बार्शी, वीणा साळुंके वय ४० रा.बार्शी, किरण शिखरे वय ३० रा.उंबर्गे, महेश शिंदे वय २७, रा.लोणी सिध्देश्वर विभुते वय ३० रा.बार्शी, विजय जोशी (बसचे वाहक) वय ३६ रा.बार्शी,  गौरीशंकर विभुते वय २८ रा.बार्शी, मन्‍मथ भुसणीकर वय ५० रा.बार्शी या अकरा जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर शासकिय रुग्णालयात आकाश जाधव, संदेश बोंडे, सागर गाढवे, पांडूरंग जाधव, उमेश अक्कलकोटे, सूरज गांधी,  महेश अक्कलकोटे, पोपट विधाते, महेश आलमलकर, केदार आलमलकर, प्रशांत विधाते, किरण वाघमारे,  विजय गिराम यांच्यावर उपचार सुरु आहेत.
    सदरच्या घटनेनंतर पांगरी पोलिस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा व उपचार घेत असलेल्या यात्रेकरुंकडून सविस्तर माहिती घेतली. टेम्‍पोचालक हनमुंते यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिल्‍यावरुन भरधाव वेगात वाहन चालवुन दोन्ही वाहनांच्या व भाविकांच्या जखमी होन्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top