उस्मानाबाद -: जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात अकरा जुगा-यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकल व मोबाईल असे मिळून सुमारे 1 लाख 38 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात अकरापैकी आठ आरोपी उस्मानाबाद शहरातील असून त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 37 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अनिल विलास रणखांब (वय 19), रोहन अंबादास भोसले (वय 24), साक्षात संजय राऊत (वय 17), अजित दिपक घुटे (वय 29), संतोष शिवाजी जाधव (वय 28), रोहन विलास रायबाण (वय 18), आशपाक शमशोद्दीन शेख (वय 23), श्रीकांत शिवाजी माळी (वय 28) सर्व रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद असे अटक करण्यात आलेल्या जुगारी आरोपींचे नावे आहेत. यातील उस्मानाबाद शहरातील आरब मज्जीदच्या शेजारी रणखांब यांच्या घराचे पाठीमागे तिरट नावाचा खेळताना पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेत मोटारसायकल, मोबाईल, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असे मिळून 1 लाख 37 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर गणेश विठ्ठल सोनटक्के (वय 25 वर्षे), नरसिंग रामचंद्र उबाळे (वय 44) दोघे रा. तुळजापूर यातील अनुक्रमे भवानी रोड तुळजापूर, शिवकाशी लॉजजवळ तुळजापूर येथे मुंबई व कल्याण नावाचा मटक खेळताना आढळल्याने त्यांच्याकडून 1 हजार 50 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. ताई सुभाष पवार (वय 45, रा. कळंब) सुरट मटका नावाचे जुगार खेळताना पोलिसांच्या धाडीत सापडले. त्याच्याकडून 120 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.