पांगरी :- बालाघाट पर्वतरांगातील भुम, म्हसोबावाडी, तेरखेडा, कोरेगांव, काटेगांव, चारे शिराळे, उक्कडगांव, पांगरी, येडशी, उस्मानाबाद, तुळजापुर आदी परिसरातील जवळपास 150 किलो मीटरच्या डोंगरांगांच्या पटयात डोंगरांची शेतक-यांकडुन खरेदी मोहिम तेजीत असुन खरेदी मोहिम फत्ते झाल्यानंतर या डोंगरांवर सलग पवनचक्यांचे संच उभे करून त्या संचामधुन विजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे चर्चिले जात आहे. शेतक-यांच्या गळयाभोवती पवन उर्जा रूपी फास आवळत चालला असुन संबंधीतांच्या नियोजनाप्रमाणे उंच डोंगर कडयांवर पवनचक्यांचे अवाढव्य असे प्रकल्प उभे राहिल्यास या भागातील शेतीला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होऊन शेतकरी नागावला जाण्याची शक्यता असुन आधिच जगण्यासाठी कसेतरी झगडत असलेल्या शेतक-यांवर काय वेळ येईल हे येणारा काळच सांगेल.
पर्जन्यमान घटणार
या बालाघाटाच्या पर्वतरांगावर भविष्यात पवनचक्यांचे संच उभे राहिले तर मुळातच अत्यल्प पर्जन्यमानाचा पट्टा म्हणुन प्रचलित असलेल्या या भागात वरूण राजा आपली जेमतेम हजेरीही न लावता तसाच पुढे रूसुन जाणार आहे. पवनउर्जा प्रकल्पांना शास्त्रीय आधार असला तरी सकृतदर्शनी पर्जन्यमानावर विपरीत परिणाम झाल्याची उदाहरणे असल्यामुळे शेतक-यांमध्ये भययुक्त वातावरण तयार झाले आहे. कारण उंच व महाकाय व गगनचुंभी स्वरूपात असणा-या पवनचक्यांच्या पात्यांमुळे बाष्पयुक्त हवेचे ढग हे येथुन पुढे ढकलले जाणार आहेत. येथे ढगच थांबु शकणार नसल्यामुळे या पटयातील शेतक-यांना कायम फक्त ढगांकडेच डोळे लावुन बसावे लागणार आहे. एकदा जर का सदर प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास पुन्हा त्या भांडवलदाराना साधा विरोध करण्याचीही ताकद या भागातील पिचलेल्या शेतक-यांमध्ये रहाणार नसुन तो पुर्णतः जमिनदोस्त होऊन दिशाहीन होणार आहे.

शेतकरी नागावला जाणार
सध्या या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प स्वरूपात असले तरीही घाटमाथ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी वगळुन नदीद्वारे खाली येऊन येथील शेतकरी व जनतेची गरज भागवत आहे. उपलब्ध पाण्यावर काटकसर करत तो कसेतरी शेती उद्योग करून उपजिविका करण्याचा प्रयत्न करून तग धरून आहे. पवनचक्यांचे पयोग झाल्यास येथील शेतकरी पुर्णतः नागावला जाणार असुन तो देशोधडीला लागल्याशिवाय रहाणार नाही. कोणाचाच आधार नसलेल्या शेतक-यांना हात कोण देणार हा मोठा प्रश्न उभा राहु पहात आहे.
शेजारील तालुक्याचे उत्तम उदाहरण
सोलापुर जिल्हयातील सांगोला व शेजारील सातारा जिल्हयातील कांही तालुक्यात कायम दुष्काळाच्या छायेत जगणा-या शेतक-यांसारखीच कांहीशी अवस्था या भागातील शेतक-यांची होऊ शकते. सांगोला तालुक्याच्या सिमेला पवनचक्यांच्या प्रकल्पांनी घेरलेले असल्यामुळे त्याची झळ त्या तालुक्यातील बळीराजांसह सर्वसामान्य जनताही भोगत आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळयात पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव दाखल करणा-या पांगरी परिसरातील जनतेला प्रकल्प झाल्यास कोणत्या परिस्थतीला सामोरे जावे लागेल याचा विचारच न केलेला बरा असे येथील भयभित जनतेमधुन बोलले जात आहे.
- गणेश गोडसे