मल्लिकार्जून धारुरकर
उस्‍मानाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्‍यावतीने दिला जाणारा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार दै. यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना जाहीर झाला आहे. सदरील पुरस्काराचे वितरण ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांच्ङ्मा हस्ते दि. २५ नोव्हेंबर रोजी करण्‍यात येणार आहे.
    मल्लिकार्जून सोनवणे यांना आजपर्यंत महात्‍मा गांधी तंटामुक्‍त पत्रकारिता पुरस्कार, कै.अनंत भालेराव स्‍मृती विशेष पत्रकारिता पुरस्कार, समर्थन मानवी हक्‍क वार्ता पुरस्कार व कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्‍मृती राष्ट्रीय कृषी वार्ता पुरस्कार मिळालेले आहेत. सदरील पुरस्कार जाहीर झाल्‍याबद्दल सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top