तुळजापूर – पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत खडकी (ता. तुळजापूर) येथे झालेल्या कामातील गैरप्रकरणी जिल्हयातील कृषी आधिक्षकासह बारा कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिस कृषी सहसंचालकानी बजावली असून याप्रकरणी खुलासा मागितला आहे.  संरपच व शेतक-यांच्या  तक्रारीवरुन  कृषी सहसंचालकांनी  ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
    उस्मानाबाद  जिल्हा कृषी अधीक्षक  एस.एम. तोटावर, तंत्र अधिकारी एस. व्ही. थोरमाटे, तुळजापूर तालूका कृषी अधिकारी डी.आर. जाधव, मंडळ कृषि अधिकारी व्ही.व्ही. पाटील, व्ही.पी. कुलकर्णी, कृषि पर्यवेक्षक डी.व्ही. वडणे, पी.एस. बिडवे, एन.ई. गायकवाड, कृषि सहाय्य्क आर.बी.मगर.ए.डी.वत्रे, एस एम. गायकवाड, आदिसह बाराकर्मचा-याना  नाटीसा बजावण्यात आले आहे.                
   तुळजापूर तालुक्यातील खडकी गाव परिसरात कृषी खात्याच्यावतीने कंपार्टमेंट बंडीगची कामे करण्यात आली होती. याकामात गैरप्रकार झाल्याची तक्रार संरपच्शाहूराज देशपांडे , तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिष जाधव , माजी संरपंच रंजना सोनवणे , कुंडलीक माने यासह नागरिकांनी यापुर्वी जिल्हाधिका-याकडे  करुन या कामात संबधित आधिका-यानी कर्मचा-यांशी संगनमत करून संबधित काम यंत्राद्वारे केल्याचे सांगुन त्याचे बील देण्यासाठी समितीचे अध्यक्ष व सचिव  यांच्यावर कोरा धनादेश देण्याकरिता दबाव आणल्याचे म्हटले होते. मात्र समितीचे अध्यक्ष व सचिव दबवाला बळी न पडल्यामूळे या दोघांना गावतील काही व्यक्तींना हाताशी धरून  ग्रामसभा घेतल्याचे दाखवून समितीचे कार्यकारणीच बदलण्याचा व बेकायदा नव्याने केलेल्या समितीच्या नावे बँकेत खाते उघडण्याचा प्रकार केला असल्याचेही सांगुन  तुळजापूर तालूक्यातील 21 गावंमध्ये कृषी विभागाच्याप अधिका-यांनी खरेदी केलेल्या साहित्याची  चौकाशी करावी अन्यथा याप्रकरणी उपोषण करण्याचा इशारा यापुर्वी देण्यात आला होता.
 
Top