पांगरी -: पवनचक्यांचा फास पश्चिम महाराष्ट्रात घट्ट होऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेलगत व मराठवाडयात विस्तीर्ण पसरलेल्या बालाघाटाच्या पर्वतरांगावर पवनचक्यांची उभारणी होत असुन जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इ.स.644 मध्ये इराणमध्ये सर्वप्रथम सुरू झालेल्या पवन उर्जा प्रकल्पाचे लोन आता सगळीकडेच पसरत आहे. पांगरी (ता. बार्शी) परिसरात मोठया विस्तीर्ण प्रमाणात पसरलेल्या बालाघाटाच्या उंचच उंच पर्वतरांगावर डोळा ठेऊन त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याच्या हेतुने महाराष्ट्रासह देशातील बडया हस्तींनी डोंगर खेरदी केल्यामुळे व या डोंगरांवर विजनिर्मितीसाठी भव्य स्वरूपात पवनचक्यांचे प्रकल्प उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे पांगरीसह शेजारील बालाघाट डोंगर भागात तसेच तीन-चार तालुक्यासह उस्मानाबाद व सोलापुर जिल्हयात शेतक-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बालाघाट पर्वतरांगात येत असलेल्या खानापुर, इसरूप, हिवरा, दिंडोरी आदी गावांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे.डोंगरमाथ्याच्या अणेक गांवामध्ये पायाभरणी पुर्ण झाली आहे. विजर्निमीर्तीसाठी नैसर्गिक स्तोत्र वापर मोठया प्रमाणात वाढत आहे. सध्याच्या चर्चेला संबंधित कंपन्यांनी मुर्त स्वरूप दिल्यास या भागातील आधीच कोलमडलेल्या अवस्थेत असलेल्या शेती व्यवसायाचे काय होणार हा मोठा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. अगोदरच निसर्गांच्या सततच्या दुष्काळी चक्रामुळे व लहरी स्वभावामुळे दुखाच्या छायेत भरडत असलेला व कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत तोटयातच शेती व्यवसाय करणा-या तसेच कसेबसे तरी पडणा-या अत्यल्प पावसावर काटकसर करून शेतीमध्ये विकासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न करणा-या शेतक-यांना पवनचक्यांचे प्रकल्प उभे राहिल्यास भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे शेतक-यांमधुन बोलले जात आहे.
अलीकडील काही महिन्यांपासुन एका बडया हस्तीने पांगरी परिसरातील डोंगर व डोंगरावरील मोक्याच्या जागा खरेदी करण्याचा सपाटा लावलेला आहे. स्थानिक भुमिपुत्रांपेक्षा कितीतरी जास्त पट रक्कम देऊन व पैशाचे आमिष दाखवुन सध्या या भागातील जमीन व डोंगराळ भाग हा या मंडळींकडुन खरेदी केला जात आहे. स्थानिक शेतक-यांना त्या त्या गांवातील पुढा-यांमार्फत जादा पैशाचा मोह दाखवुन व दिशाभुल करत त्यांच्याकडुन जमिनी बळकावण्याचे प्रकार सुरू आहेत. या भागातील अशिक्षीत शेतकरीही त्यांच्या भुलथापांना बळी पडुन स्वतः होऊन आपल्या लाख मोलाच्या जमीनी बडया उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. भोळया भाबडया शेतक-यांच्या लक्षात येणार नाही, अशा पध्दतीने त्यांच्यावर मोठी छाप टाकुन त्यांना मातीमोल बनवण्याचे काम सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या जमिनी डोंगर खरेदीची मोहिम संपल्यानंतर या भागात पवनचक्यांच्या प्रकल्पांच्या रांगा उभारून मोठी क्रांती करण्याचा त्या बडया हस्तींचा मानस असल्याचे शेतक-यांमधुन चर्चिले जात आहे. शेतकरी पवनचक्याचे प्रकल्प उभारणार अशी मिरास मारत असले तरी त्यांमुळे उदभवणा-या परिस्थतीपासुन ते दुर व अनभिज्ञ असल्यामुळे त्याचे गांभिर्य अद्याप शेतक-यांच्या लक्षात आलेले नाही. जेव्हा हे प्रकल्प सुरू होतील तेव्हा खुपच उशिर झालेला असेल. तेव्हा कांहीही केले तरी सर्व रितसर बाबी व शासकीय प्रशासकीय पातळीवरील कायदेशिर प्रकिया पुर्ण झाल्यानंतर कोणीही कांहीच करू शकणार नाही. नेमक काय चालु आहे, सत्यता काय हे जाणून घेऊन पवनचक्यांच्या विषयावर आत्ताच आवाज उचलने नितांत गरजेचे व सोईचे ठरणार आहे. त्यासाठी शेतक-यांच्या संघटनांची गरज आहे. या विस्तीर्ण पटयामध्ये पवनचक्यांचे संच उभे राहील्यास याचा फटका किती किलो मीटर परिसरातील शेतीला बसणार हे आत्ताच कोणी सांगु शकत नाही.

पवन ऊर्जा प्रकल्पांतुन वीज व अनेकांना रोजगार निर्मिती
पवन उर्जा प्रकल्पांमुळे या भागातील कांही लोकांना रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध होणार आहे. शेजारील मराठवाडा हदीतील ज्या गांवात प्रकल्पाचे काम सुरू आहे तेथे कांही स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना सामावुन घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे कांही लोंकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटण्यास व या भागातील वीज टंचाईचा प्रश्नही कांही अंशी कमी होण्यास हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे कांही उद्योगांना नुकसानीस तर कांहीना रोजगार निर्मिती उपलब्ध होणार असल्यामुळे थोडी खुशी थोडा गम अशीच कांहीशी अवस्था येथील जनतेची होऊन बसली आहे.

- गणेश गोडसे