उस्मानाबाद :- बेंगाल इंजिनिअरींग  ग्रुप व सेंटर रुरकी येथे दिनांक 16 ते23 नोव्हेंबर पर्यंत सोल्जर,टेनिकल,सोल्जर जीडी व सोल्जर ट्रेडसमॅन पदासाठी युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये आजी सैनिक/माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांची व आजी सैनिकांच्या भावासाठी भरती करण्यात येणार आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक/माजी सैनिक/विधवांच्या इच्छुक पाल्यांनी /भावांनी उपरोक्त वेळेनुसार बेंगाल इंजिनिअरिंग ग्रुप व सेंटर रुरकी येथे भरतीसाठी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी उपस्थित रहावे.असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,उस्मानाबाद यांनी केलेले आहे. 
 
Top