नळदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे घाटात अपघातग्रस्त एलपीजी गॅस टँकर उभा करताना लिकेज होऊन गॅस पसरल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते. दि. 12 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग जवळील घाटात पलटी झालेली एलपीजी गॅस टँकर शुक्रवार रोजी सकाळी उभे करीत असताना लिकेज झाल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रोकड्या हनुमान मंदीराच्या मागे दोन दिवसापूर्वी गॅसचे टँकर पलटी झाले होते. यात ड्रायव्हर व क्लिनर जखमी झाले होते. गॅस टँकरला काहीही न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सदरील टँकर उभे करीत असताना टँकरची टाकी एका ठिकाणी लिकेज झाल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते हा विचार करनु पोलिसांनी व इंडीयन ऑईल कंपनीच्या कर्मचा-यांनी लिकेज झालेली जागा एमसील लावून तात्पुरती बंद करून घेतली. परंतु टँकर उभे करेपर्यंत काहीही घडू शकते हा विचार करुन पोलिसांनी गावातील नागरिकांना स्टोव्ह, चूल, गॅस, शेगडी, फटाके, काडीपेटी, विडी, सिगारेट इत्यादी ज्वालाग्राही पदार्थ लवू नयेत, असे ध्वनीक्षेपणावरुन गावात सांगितल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर उभे करेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ही पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावरुन व मुर्टामार्गे पाठविण्याची व्यवस्था केली. संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान गॅस टँकर उभे करुन तो शहराबाहेर हलविल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. या टॅंकरमध्ये अठरा टन (अठरा हजार किलो) गॅस होतो. जर गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शुक्रवार रोजी मुस्लीम बांधवाचा मोहरम हा सण असल्यामुळे त्यांची मिरवणूकही उशिरा काढण्यासंबंधी त्यांनादेखील सुचना देण्यात आल्या होत्यार. या गॅसच्या लिकेजमुळे शहरावर दिवसभर दहशतीचे सावट होते.