कळंब (बालाजी जाधव) : शहरातील सर्वे क्र.१0८ मधील सावरकर चौक ते नवीन सराफ लाईन या भागातील व्यापार्यांना हटविण्यासाठी न. प. प्रशासनाने १२ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्या आहेत.
कळंब न. प. ने याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र त्यांना येथून हटऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. या व्यापार्यांना न. प. ने १२ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत जागा रिकामी करा अन्यथा न. प. प्रशासन जागा रिकामी करेल व त्याचा खर्च संबंधित व्यापार्यांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
या दुकानदारांना बजावल्या नोटीस :-
महमुद शिकलकर, मुक्तार पिंजारी, रामेश्वर मुंडे, कालिदास जोशी, उस्मान बागवान,मुश्ताक अ. काझी, मियाँ तांबटकरी, आशाबाई मुंडे, सुनील कुंकुलोळ, रमन कुंकुलोळ, नियामत हन्नुरे, विनयचंद बलाई, रमेश ढोले, विनयचंद बलाई, यासीनखाँ पठाण, रामचंद्र पाटील, नरेंद्र ओझा, भारत जाधव, प्रभाकर बारटक्के, संतोष मोरे, सुधाकर मोरे, फय्याज काझी, रामभाऊ मोरे, रियाज शेख, बापू भाग्यवंत, रमेश एखंडे, विमलबाई माळवदे, अनंत काळे या दुकानदारांचा समावेश आहे.
दरम्यान पालिकेतील सत्ताधारी मंडळीच्या या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे.या जागेतील व्यापार्यांचे इतरत्र पुनर्वसन करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व्यापारी पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच तेथे व्यापारी संकुल उभा करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय मुंदडा, प्रा.श्रीधर भवर, गीता पुरी, काशीबाई खंडागळे यांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहराला आगामी काळात पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता असतानाही पालिकेने दुकानगाळ्याचा घाट घातल्याबद्दल राष्ट्रवादीने हा मोठा विनोद असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
एकूणच शहरातील सर्वे क्र.१0८मधील नियोजित व्यापारी संकुलाच्या उभारणीवरून पालिकेत काँग्रेस-सेना व राष्ट्रवादी समोरासमोर उभे राहिले आहेत.यामुळे आगामी काळात पालिकेत वातावरण तापलेलेच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान वरील सर्व्हेमध्ये प्रभाकर लक्ष्मण बारटक्के यांनी न्यायालयात न.प. विरोधात प्रकरण दाखल करुन कराच्या पावत्या, सिटी सर्व्हेला असलेली नोंदची नक्कल सादर केली. यावेळी अँड. प्रताप सोनटक्के यांनी न्यायालयात युक्तीवाद करुन न्यायाधीश एन.आर. तळेकर यांनी दि. 21 नोव्हेंबरपर्यंत जागा रिकामी करण्यास स्थगिती दिली आहे.