उस्मानाबाद :- इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव,जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम 2012 मधील नियम 14 नुसार विद्यार्थी नमुना 16 मध्येच विहित नमुन्यात जाती प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.2,मित्र/टिळक नगर,पोस्ट कार्यालयाजवळ, लातूर यांचे कार्यालयाकडे पाठविण्यात यावा, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
     सदरचा नमुना क्रमांक 16 हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद या कार्यालयामधुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी प्राप्त करुन घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 02472-222014 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top