मुंबई -: सहकार कायद्यात झालेल्या सुधारणांबाबत मुंबई जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सभासदांना 97 व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी व सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी, दुपारी 3.30 वाजता रंगशारदा सभागृह, के.सी. मार्ग, लिलावती हॉस्पीटलजवळ, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील हे या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे असून वस्त्रोद्योग मंत्री मो. आरीफ (नसीम) खान हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी, सहकार राज्यमंत्री सुरेश धस, खासदार अॅड. गुरुदास कामत, खासदारप्रिया दत्त आदीमान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद तसेच सर्वनागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.