पांगरी -: पांगरी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी व प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब गोडसे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.मृत्युसमयी ते 58 वर्षांचे होते.त्यांच्यावर त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वस्तरीय नागरिक उपस्थित होते.पांगरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय गोडसे यांचे ते बंधु होत.