पांगरी -: पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या एक दिवस शाळेसाठी या अंतर्गत उक्कडगांव (ता.बार्शी) येथील जिल्हा परिषद प्रशालेला सोलापुर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रा. संजय पाटील-चारेकर यांनी एक दिवसाच्या शाळेत सहभाग घेऊन शाळेची तपासणी करून समाधान व्यक्त केले.
    आयुक्तांच्या आदेशानुसार गुरूवार रोजी सकाळी उक्कडगांव येथील जि.प.शाळेत येऊन विद्यार्थांना शिकवले. तसेच प्रशालेची तपासणी करून गुण पडताळणी, पट पडताळणी करण्‍यात आली. गुणवत्ता व उपस्थिती, बाथरूम, किचन शेड, याची पाहणी समाधानकारक जाण्‍ावली. प्रशालेत विदयार्थांना पाणी व्यवस्था उपलब्ध करून देऊ असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मुंढे, उपाध्यक्ष आबा मुंढे यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर जाधवर, शंकर गरड आदी उपस्थित होते.
(गणेश गोडसे)
 
Top