नळदुर्ग : येथील अंबाबाई देवस्थानच्या सिमोल्लंघनासाठी राखून ठेवलेल्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून व्यापारी गाळे बांधल्याप्रकरणी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिका-यांसह विरुद्ध तुळजापूर येथील न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे नळदुर्ग शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नळदुर्ग शहरातील दसरा सिमोलंघन पालखी संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव खुशालसिंग ठाकूर यांनी याबाबतची तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या तक्रारीत ठाकूर यांनी म्हटले आहे की, सर्व्हे नंबर २१६ ची जमीन सरकारी गायरान असून ही जमीन शासनाची आहे. या जागेवर दरवर्षी दस-याच्या दिवशी जगदंबा देवीची पालखी दाखल झाल्यानंतर सिमोल्लंघन सोहळा साजरा होतो. ही जागा अंबाबाई देवीच्या सिमोलंघनासाठीच राखून ठेवण्यात आलेली आहे. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथे सिमोलंघनाचा सोहळा पार पडतो. परंतु देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी सव्र्हे नंबर २९ वरील गावठाण जमिनीवर जगदंबा देवी ट्रस्टचे घर नंबर १३३० ची बनावट व बेकायदेशीर नोंद घेतली आहे. त्याचबरोबर दुस-या ८-अ मध्ये सव्र्हे नंबर २९ ऐवजी २१६ अशी बनावट दुरुस्ती केल्याचेही तक्रारीत नमुद केले आहे.
याच बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरील जागेचे मालक असल्याचे भासवून धर्मादाय आयुक्त लातूर यांना खोटी व बनावट माहिती आणि कागदपत्रे सादर करून या जागेवर धर्मशाळेसह मंगलकार्यालय बांधण्याची परवानगी मिळविली आहे. परंतु परवानगी मिळविल्यानंतर सिमोलंघनासाठी राखून ठेवलेल्या जागेवर अनाधिकृत व बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे काढण्याचा कुटील डाव विश्वस्तांनी रचल्याचे न्यायालयास दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

निर्मिती केली जात असलेली दुकाने ही ३० वर्षांच्या बीओटी तत्वावर बेकायदेशीरपणे बांधण्यात येत आहेत. यासाठी तत्कालिन मुख्याधिका-यांशी संगनमत करून पालिकेचा बांधकाम परवानाही संबंधितांनी मिळविला आहे. याप्रकरणी १८ जानेवारी २०११ रोजी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी मंडळ अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यात सदरील जागा ही अंबाबाई देवस्थान ट्रस्टच्या नावे कशी झाली, याबाबत विश्वस्तांकडे विचारणा केली. त्यावर कुठलेच कागदपत्रे विश्वस्तांकडे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदरील जागेवर सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचेही पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.
देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी शासनाची, देवीभक्तांची व धर्मादाय आयुक्तांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे फसवणूक केल्याचे तक्रारीत ठाकूर यांनी म्हटले असून, त्यांनी अॅड. गंजे यांच्यामार्फत तुळजापूर न्यायालयात ही तक्रार दाखल केली. त्यावरून देवस्थान ट्रस्टचे रमेश भानुदास जाधव, देविदास बाबाराव मोरे, सुरेश अशोक गायकवाड, नागनाथ निवृत्ती नागणे, विलास प्रभाकर पुदाले, उदगीर येथील डेव्हलपर्सच्या वतीने काम पाहत असलेले पंचभाई अफरोज शिकूर यांच्याविरुद्ध न्यायालयात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरात एकच खळबळ उडाली आहे.