उस्मानाबाद :- शहरातील 17 माध्यमिक शाळेतील 3 हजार 500 विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद (कन्या) प्रशालेत विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकासमवेत केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांनी दिली आहे.
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब मंडलिक यांनी संविधान प्रास्ताविकेचे मराठीतून वाचन केले तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सय्यद तब्बसूम मॅडम यांनी उर्दू मधून वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांनीही एकसुरात वाचन केले. धाराशिव प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
संविधान दिनानिमीत्त भारतीय लोकशाहीची स्वातंत्र्य, समता, न्याय आदर्श मुल्य समाजातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातून विद्यार्थ्यांची फलकासह प्रभातफेरी काढण्यात आली होती. शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुल, धाराशिव प्रशाला, सरस्वती हायस्कुल ,आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालय, भाई उध्दवराव पाटील प्रशाला, भारत विद्यालय, शम्सुल उलूम उर्दु हायस्कुल, समता माध्यमिक विद्यालय, जि. प. माध्यमिक प्रशाला, जि. प. कन्या प्रशाला, छत्रपती शिवाजी विद्यालय, शरद पवार हायस्कुल, तेरणा हायस्कुल, जीवनराव गोरे हायस्कुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल, तेरणा हायस्कुल, शिवाजी विद्यालय सांजा रोड तसेच नवीन माध्यमिक शाळा शाहूनगरातील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी संविधान वाचनात सहभाग नोंदवला.
कार्यक्र यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, विस्तार अधिकारी के जी धुरगुडे, समादेशक बरडे, एस आर भोसले, ए के, संविधान फौंन्डेशनचे सुजित ओव्हाळ, हुंकार बनसोडे तसेच पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी प्राचार्य बी. एस. पाटील यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.