उस्मानाबाद :- जिल्ह्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक/ प्राचार्याना सूचित करण्यात येते की, वेतन देयक शालार्थ प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने योजना निहाय सन 2012-13 च्या मंजूर सेवक संचानुसार पदे शाळेस ऑनलाईनव्दारे सोडण्यात आलेली आहे.
मुख्याध्यापक/प्राचार्यांनी कर्मचा-यांची ऑनलाईनवर माहिती भरुन सदर भरलेल्या माहितीच्या कागदपत्रांची संचिका सादर करुन तपासून घेतल्याशिवाय कर्मचाऱ्यास मंजूरी देता येणार नाही. माहे डिसेबर 2013 पासून वेतन देयक ऑनलाईनवरच स्वीकारले जाणार असून नेहमीच्या पध्दतीप्रमाणे डिसेंबर 13 चे देयक तयार करुन सोबत ऑनलाईनवर सादर केलेल्या वेतन देयकाची हार्डकॉपीसह देयक सादर करावे. हाताने तयार केलेले वऑनलाईन वर सादर केलेले देयकाची तपासणी करुनच देयक तपासणीसाठी सादर करावीत, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
तसेच डिसेंबर 2013 व त्या पुढील देयक या कार्यालयाच्या पुढील सूचनेपर्यत याच पध्दतीने सादर करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन शिवाय मासिक वेतन देयक स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, याबाबत कांही अडचणी आल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबादशी संपर्क साधावा.