मुंबई -: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची प्रभावीव यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी पुरक व प्रबंधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणा-या वृत्तपत्राच्या बातमीदारांना जिल्हास्तर, विभागीय स्तर व राज्यस्तरावर शासनातर्फे प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांमध्ये राज्यमंत्री(गृह), अपर मुख्यसचिव(गृह), पोलीस महासंचालक, प्रधान सचिव (विशेष) गृहविभाग, महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी किरण नाईक, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, पुण्यनगरी दैनिकाचे प्रतिनिधी मंदार पारकर,भास्कर या हिंदी दैनिकाचे प्रतिनिधी फैजल मलिक, हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी सुरेंद्र गांगण हे या समितीचे सदस्य असतील तर सहसचिव, गृह विभाग हे सदस्य सचिव असतील. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर आहे.