सोलापूर :- कार्तिकी यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2013 या कालावधीत पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस कायदा 1951 च्या 37(4) कलमान्वये जाहीरनामा जारी करण्यात येत आहे.
    यात्रेदरम्यान सार्वजनिक व इतर धार्मिक विधीच्या वेळेस सोडून मंदिर यात्रेकरुंना दर्शनासाठी खुले राहिल. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी स्त्री व पुरुषांची एकच रांग आहे. पदस्पर्श दर्शनबारी गोपाळपूर रोडपासून सुरु होऊन ते एकवीरा देवीच्या बोळातून, अंबाबाई दरवाजा सोळखांबी, दर्शन देवळा समोरुन भाविक दर्शन घेऊन पश्चिम दरवाजाने बाहेर पडतील. तसेच उत्तर दरवाजातून व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, पासधारक प्राप्त भाविकच मंदिरात प्रवेश करु शकतील इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराभोवती असलेल्या इतर कोणत्याही इमारतीच्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई असून सोळखांबी जवळील उत्तरेकडील दरवाज्याने कोणत्याही भाविकाने प्रवेश करु नये. त्या दरवाज्यास त्याचबरोबर अन्य दरवाज्यास कुलुप लावुन दर्शनबारीचे नियोजन करण्यात यावे. आपत्कालीन प्रसंगी तसेच प्रशासकीय व शासकीय कामकाज आवश्यकतेनुसार मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी मंदिर समितीने योग्य मनुष्यबळ नेमावे. ज्या भाविकांना दर्शन बारीतून जावयाचे नाही त्यांनी मुखदर्शनबारी 33 कोटी दरवाज्या जवळील गणपती दरवाज्याने म्हणजेच पूर्वेकडील प्रमुख दरवाज्याने जावयाचे आहे. सभामंडपाच्या डावीकडील विभागातून मंदिर प्रवेश करावयाचा व सोळखांबी जवळून मुखदर्शन करुन 84 दरवाज्याने बाहेर पडून रुक्मिणी मंदिराच्या मुख्य दर्शनबारीमध्ये सामिल व्हावे. संबंधित भाविकाने रुक्मिणी सभामंडपात येऊन रुक्मिणीचे मुखदर्शन करुन उत्तर दरवाज्यातून बाहेर पडावे. वरील आदेशात परिस्थितीनुसार आवश्यक ते फेरबदल उप विभागीय दंडाधिकारी, पंढरपूर व कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, पंढरपूर हे करतील अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.   
 
Top